Featured
Posted in तिच्यावरील कविता, Uncategorized

कोण आहेस तू ………!!!!

कोण आहेस तु….!!!

माझ्या स्वप्नांमध्ये येणारी,
मला प्रेमसागरात तुडूंब बुडवणारी,
माझ्या काळजाचा ठोका चुकवून मला सत्यात उतरवणारी,
कधी तु माझ्या सत्यात उतरशील काय….???

कोण आहेस तु…..!!!
मला कल्पनेच्या विश्वात भटकावणारी,
कल्पनेच्या विश्वातही माझ्या ह्रदयाच्या तारांना छेडणारी,
माझ्या दु:खानाही सुखात बदलणारी,
कधी तु माझ्या सुखात सहभागी होशील काय….???

कोण आहेस तु….!!!
तुझ्या एका नजरेतच मला घायाळ करणारी,
तुझ्या मधुर कंठाने कडूलाही गोड करणारी,
तुझ्या एका स्पर्शाने अंग अंग मोहरणारी,
कधी तु माझ्या जीवनात मोहोर आणशील काय….???

कोण आहेस तु….!!!
तुझ्या एका भेटीसाठी मला क्षणक्षण तरसवणारी,
माझ्या डोळ्यांच्या आरशातुन माझ्या मनात जाऊन बसणारी ,
आणि कल्पणेच्या कुंचल्यातून परत स्वप्नांमध्ये येणारी ,
या कुंचल्यातील रंग कधी तु माझ्या आयुष्यात उधळशील काय….???

कोण आहेस तु….!!!
स्वतःला कँरमच्या खेळातील राणी म्हणावणारी,
बुद्धीबळपटावरील राजाला वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारी,
तुझ्या विरहाच्या कल्पनेनेही  मला माथेफिरु बनावणारी ,
आपल्यातील दुराव्याच्या आगीत मला रोज होरपळवणारी,
कधी आपल्यातील हा दुरावा तु दुर करशील काय…???

कोण आहेस तु…..!!!
माझ्या मनात प्रेमाचा अंकुर फुलवणारी,
तुझी स्तुती गाता गाता,
तुझे रुप पाहता पाहता,
माझ्या पेनाच्या शाईमधुन या कागदावर कवितेच्या रुपात उतरणारी,
कधी माझ्या जीवनाची कविता तु बनशील काय…???

कोण आहेस तु….!!!
तुझ्या प्रत्येक सुखात प्रत्येक दु:खात तुझीच आहे म्हणणारी,
तुझ्या मनातील लुप्त भावनांना  तुझ्या निरागस चेहऱ्यावरुन स्पष्टपणे
व्यक्त करणारी,
माझ्या बडबडनाऱ्या मनाला तुझ्या नकाराच्या भीतीने नेहमीच अबोल करणारी,
माझ्या ओठावरील कधी बोल बनशील काय…???
माझ्या मनातील लुप्त भावनांना  कधी सुप्त करशील काय…???
कधी तुझ्या साठी वेडावलेल्या प्रियकराची  तु प्रेयसी बनशील काय..???

पुन्हा एकदा विचारतोय ,
कोण आहेस तु…!!!
कुठे आहेस तु….!!!
माझ्या या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी माझ्या स्वप्नांतुन,
माझ्या सत्यात तु एकदा तरी उतरशील काय….???
………. …….तु एकदा तरी उतरशील काय…..???

                                                                                  ——– आनंद कवठेकर

Posted in Uncategorized

चुरगळलेला कागद….

गीत नाही सुर नाही
मोहणारे बोल नाही
जरी दावीले मी स्वप्न वेडे
भुलवणारे माझे प्रेम नाही..
गुलाबाची फुले नाही
फिकी फिकी कॉफी नाही
इथे असेल चुरगळलेला कागद
अन् शिंपडलेली अत्तराची शाई..
आठवणींचा मवाळ हुंदका नाही
अन् काळजीची सावत्र शोभा नाही
विखुरले इथे मी शब्द सारे..
कुणी मोरपंखी प्रेमस्वप्न नाही
सुख तुझे ते स्वप्न माझे
रडवेल कधी असा मी मित्र नाही
गीत नाही सुर नाही
मोहनारे बोल नाही
जरी दाविले मी स्वप्न वेडे
भूलवणारे माझे प्रेम नाही…

-Anand Kawathekar

Posted in Uncategorized

आभास..

स्वप्न होते परी ही होती
झुळझुळणारी दरीही होती
चांदण्यांचे थवे ही होते
चंद्र तारे सवे ही होते
वेळ संपली तुटली स्वप्ने
करकरणारे ऊनही होते
क्षण साधाया भासही होते
उजवी वळणे डाव्या वाटा
कुजरे बुजरे ताट ही होते
कुजबुजणारी गर्दी होती
घड्याळावरी काटे होते
काट्यावरील बूजरे होते
माणुसकीची लक्तरे होती
क्षण साधणारे प्रेम ते होते
जणू गांधारीचे सोंग ते होते
कौरवांची रांग ही होती
अन् द्रौपदी जणू एक भास ही होती
खोट्या नाट्या शपथा होत्या
सवलती मधली वचने होती..
दिवस सरला..गर्दी विरली
परतलेली स्वप्ने ही फिरली
चांदण्यांचे थवे ही आले
चंद्र तारे सवे ही आले
झुळझुळणारी नदीही दिसली
स्वप्न ही आले अन् परीही आली

-Anand Kawathekar

Posted in Uncategorized

उधार नातीं….

उनाड वारा , उधार नाती
की केवड्यांच्या सुगंध राती
अगाऊ होते ते रातकिडे
करी इशारा दिशाही साती
नको म्हणाली मज तो इशारा
तू चंद्रमोळी मी शुक्रतारा
भेदरती स्वप्ने पकडली हाती
छबी काजव्यांची शिंपडून राती
नको म्हणाली दावू काजवे ही
अधीर चांदण्याचा सांडूनी पसारा
कटाक्ष पडता उठला तो शहारा
मधाळ होती अधरे अन टिपूर त्या धारा
न्हात गात निजलो अन अधरांसवे भिजलो
खट्याळ होती नजरे , अन चिंब देह सारा
तृप्त तृप्त झाली ही गंधाळली माती
सवे उनाड वारा अन उधार ती नाती
पण मंतरलेली ती रात्र होती
का सरण्याचा अट्टाहास सारा
मी चंद्रमोळी अन तू शुक्रतारा

– Anand Kawathekar

Posted in Uncategorized

नजरें 👀

अब वो हमसे नजरें कम मिलाते है..
अब ये वो रास्ते भी नही,
जो हम यूँ बेवजह टकराते है..
ख़लिश है हमारी माथे पे
ओठो पे उनके भी चुप्पीे है
एक गुठली सी अटक गई है इन गालों में
की मुस्कुराहट भी आंखों में नम हुई है
क्या वो जानकर भी अनजान है
नादानी मोड़ ही ली है या सच मे ही नादान है
अब ना इन बातों पे हमे गुमार है
नाही बिखरे लफ़्ज़ों के हम शुक्रगुज़ार है
बस्स कोई दरिया मोड़ लिया है , एक मंजर छोड़ दिया है
ख़लिश लिए चल रहे है , अरमानो को हम बदल रहे है.
चुभती है वो नजर आज भी
अश्को में सोती है हर रात भी
गर्दिश में बेहके है तारे या आज भी वो बेईमान है
टूट रही है हर दुआ क्या टुटा हुआ ही मेरा ही ईमान है
बस्स थक गयी है ये आंखे या आंखों में उठा कोई तूफान है
तरसते आंखों को उन नजरो की तलाश है
या फिर मुड़े हुए रास्तो पे ये खुद की ही एक तराश है
क्योंकि अब तो वो नजरें हमसे कम मिलाते है
ना ही वो रास्ते है जो हम बेवजह टकराते है!!!!

Posted in Uncategorized

अबोल…

धुंदल्या दिशा दाही , विरलेले स्वप्न पाही
तुज सामोरी जाता जाता बोल माझे का अबोलच राही।।

रातकिड्यागत प्रेम माझे अंधारातच वाट दावे ,
तू सामोरी नसताना का हे चलबिचल व्हावे
पण का हे तुजला उमजत नाही
काळोखाच्या वाटेवरती दूर हे तुजला शोधत जाई
गहिवरले मन माझे वाट तुझीच पाहत राही
धुंदल्या दिशा दाही विरलेले स्वप्न पाही
तुज सामोरी जाताना बोल माझे का अबोलच राही ।।

प्रथमक्षणी पाहता तुजला तुझ्यावरती भाळलो होतो
तुझ्या कुरळ्या केसांमध्ये गजऱ्यागत ग माळलो होतो
पहिल्याच भेटीत आपल्या डोळ्यात होते स्वप्न काही
क्षणभंगुर भेटीत आपल्या का तुला ते दिसलेच नाही
धुंदल्या दिशा दाही विरलेले स्वप्न पाही
तुज सामोरी जाताना बोल माझे का अबोलच राही ।।

वाऱ्यावरती गंध पसरावा तसे मन माझे हे गंधीत होई
तुझ्या येण्याची चाहूल मिळता नभ पाचोळ्यागत होऊन जाई
नाव तुझे ते कानी पडता शब्द स्फुरती मजला काही
नजर तुझी ती नजरेला भिडता कविता बनुनी ओठातून वाही
धुंदल्या दिशा दाही विरलेले स्वप्न पाही
तुज सामोरी जाता जाता बोल माझे का अबोलच राही ।।
बोल माझे का अबोलच राही।।

….. Anand Kawathekar

Posted in Uncategorized

मुखवटा💀

शांत शीतल चेहऱ्यामागे लपलेला असतो
अथांग सागर उंच उसळी घेत सीमोल्लंघन करणारा
आकाशाच्या अहंकाराला चुटकीसरशी गिळणारा..
याच शीतल मुखवट्यामागे चेहरा असतो क्रोधाचा ,
कळला तर दिसणार नाही अन
दिसला तर शीतलता उरणार नाही
अशाच एका संभ्रमी विश्वाचा….
याच शांत चेहऱ्यामागे ठिणगी असते प्रेमाची
कटुतेलाही उजळवून टाकेल अशाच सुंदर प्राक्तनांचा..
हा सुंदर शांत मुखवटा कधी वाटतो
उदासवाना, कोमेजलेला..
बकुळीचा गंध लेऊनी प्राजक्ताची झालर ओढलेला…
हा शांत शीतल चेहरा म्हणजे एक उलगड आहे..
उलगडणाऱ्या कोड्यालाही गुंतवणारी एक दरवळ आहे
मग याच कस्तुरी दरवळीचा
मागोवा घ्यावा त्या मृगणायनांनी
तर हाती लागणारा पुरावाच हा सबळ आहे
हा हवाहवासा वाटणारा मुखवटाच …
एक मृगजळी मृगजळ आहे
मृगजळी मृगजळ आहे…..

https://www.instagram.com/p/Bwy8UQ2j52g/?utm_source=ig_share_sheet&igshid=intb9ytjm6bn

……… Anand kawathekar

Posted in Uncategorized

सराब…

इबादतें करते हो दिल ए जान से
पूरी करने जमीं पर वो उतर पाएगा क्या!!!
सुकून देता है वो अकेलेपन में
पर बिता हुआ बचपन वो लौटाएगा क्या??
लोरिया सुनी है उसकी आघोष में आज फिरसे उन्हें वो सुनाएगा क्या??
ताक़ रहे हो उसे बड़े दूर से
आज फिर चेहरे पे वो मुस्कान लाएगा क्या!!!
माशुकाए बसती है हर किसी की उसमे
पर किसी पे अपना हक वो बतलाएगा क्या??
वादे करते हो माशूकाओं से अपनी
पर इसे पाकर उनको थमा पाओगे क्या??
इसे तोड़कर लाने की ख्वाईश रखते हो
फिर टूटे दिल को अकेले संभाल पाओगे क्या!!!
जानते हो उसकी भी एक माशूका है, तो उस चांदनी को उससे अलग कर पाओगे क्या??
दूरिया मिटा रहे हो स्याही से अपनी..
थोड़ी शीतलता अपनी नज्मो में दिखलाओगे क्या!!!
तक रहे हो बडी दूरी से उसे…
बतलाओ कभी उसे भूला पाओगे क्या??!!!
चांदनी रात में उस चाँद से फिरसे नजर मिला पाओगे क्या!!!!

-Anand Kawathekar ✍